Ad will apear here
Next
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द
गायक अमरेंद्र धनेश्वर यांनी सरोदवादक केन झुकरमन यांची मुलाखत घेतली.

पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला.  सवाई गंधर्व स्मारक येथे झालेल्या या संवादात्मक कार्यक्रमात गायक अमरेंद्र धनेश्वर यांनी केन झुकरमन यांची मुलाखत घेतली. या वेळी ते बोलत होते.    

केन झुकरमन
झुकरमन म्हणाले, ‘लहानपणी मी पियानो शिकण्याचा निष्फळ प्रयत्न केला. नंतर गिटार हाती घेतली आणि ती आवडू लागली. पॉप, रॉक संगीत गिटारवर वाजवू लागलो. महाविद्यालयात शिकताना आयोवामध्ये मी ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांच्या सरोदच्या कार्यक्रमाची जाहिरात पाहिली आणि कुतूहल म्हणून कार्यक्रमाला गेलो. त्यांनी सावकाश आलाप वाजवत कार्यक्रम सुरू केला. ते संगीत इतकं आरामदायक होतं की काही क्षण मला चक्क झोप लागली. जागा झालो तेव्हा ते अत्यंत सामर्थ्याने आणि ऊर्जेने वाजवत होते. माझ्यासाठी तो अनुभव अतिशय प्रभावी होता. ते एका मोठ्या परंपरेशी जोडले गेले आहेत हे मला समजत होते.’

‘अली अकबर खानसाहेब सॅन फ्रान्सिस्कोमध्ये शिकवत असत. मी तिथे शिकायला गेल्यानंतर प्रथम मला सतार शिकायची आहे की सरोद, हा प्रश्न विचारला गेला. साध्या बोटांनी तारा छेडून पाहिल्या असता मला सरोदपेक्षा सतारचा आवाज अधिक आवडला. म्हणून प्रथम एक वर्ष सतार शिकलोदेखील, परंतु माझे सरोदविषयीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढतच गेले. एक दिवस अली अकबर खान साहेब स्वप्नात आले आणि त्यांनी सरोद हाती घे, असे सांगितले. दुसऱ्या दिवशीपासून मी सरोदकडे वळलो. आजही माझी पहिली सतार माझ्याकडे आहे, परंतु ती आता शांत असते,’ असे झुकरमन यांनी सांगितले.

‘अली अकबर खानसाहेब यांनी आम्हाला प्रथम गायला शिकवले. त्यातून भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया पक्का होत जाईल असा त्यांचा विश्वास होता,’ असेही त्यांनी नमूद केले.  

पंडित भीमसेन जोशींविषयीची आठवण सांगताना केन म्हणाले, ‘खान साहेबांबरोबर भारत दौऱ्यावर आलो असताना, मी भीमसेन जोशी यांना अनेकदा भेटलो आहे. एकदा पुण्यात माझा एक छोटेखानी कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर एक-दोन दिवसांनी मी भीमसेन जोशी यांचे आशीर्वाद घेण्यास गेलो. त्यांनी माझ्या कार्यक्रमाविषयीच्या बातम्या वाचल्या होत्या. त्यांनी माझे कौतुक केले आणि तिथेच मला सवाई गंधर्व महोत्सवात सादरीकरणासाठी आमंत्रण दिले.’

दरम्यान, ‘षड्ज’ या शास्त्रीय संगीतावरील लघुपट महोत्सवात प्रमोद पाटी दिग्दर्शित ‘मोमेंट्स विथ दी माईस्ट्रो’ (पंडित रविशंकर) हा लघुचित्रपट व ‘म्युझिक ऑफ इंडिया’ (संतूर) आणि मधू बोस दिग्दर्शित ‘भरतनाट्यम्’ (डान्सेस ऑफ इंडिया) हे माहितीपट दाखविले गेले.   

(To read this news in English, please click here.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZRQCH
Similar Posts
पुण्याच्या ओंकार मोदगीचा लघुपट एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुणे : पुण्यातील पटकथालेखक व दिग्दर्शक ओंकार मोदगी याच्या ‘डोगमा’ या लघुचित्रपटाची लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी लॉस एंजिलिसमध्ये हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.
इतिहास जिवंत होणार… मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील महत्त्वाचा लढा म्हणजे महाडचा सत्याग्रह. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावं यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. हा लढा फक्त पाण्यापुरता मर्यादित नव्हता तर ती सुरुवात होती मानवी मुलभूत हक्कांच्या चळवळीची. या घटनेनंतर समतेचे वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून वाहू लागले
सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ‘सवाई’ला सुरुवात पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान या ठिकाणी असलेल्या सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, बुधवार, ११ डिसेंबर रोजी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला औपचारिक सुरुवात करण्यात आली.
अनवट सुरावटींनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात पुणे : संगीतप्रेमी चातकासारखी ज्या संगीत महोत्सवाची वाट पाहत असतात, त्या ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला बुधवारी, ११ डिसेंबर रोजी अनवट सुरावटींनी बहारदार सुरुवात झाली. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलात हजारो रसिकांच्या उपस्थितीत पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांनी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language